कोल्हापूर दि 11:कोल्हापुरातील जुना बुधवार तालीम मंडळाच्या गणेश मूर्तीचे आज मोठ्या थाटामाटात आगमन करण्यात आले.यावेळी पारंपरिक वाद्यांसह कायद्याचे काटेकोर पालन करत डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकली. या आगमन सोहळ्याचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी श्री.कृष्णराज महाडिक, जुना बुधवार तालमीचे अनिल निकम, धनंजय सावंत, दिगंबर फराकटे, उत्सव समिती अध्यक्ष केदार शिंदे, खजानीस कल्पेश नाळे, सुशांत महाडिक, महेश शिंदे, अजिंक्य चौगुले, राकेश माताडे, अक्षय घाडगे, शिवसेना उपशहरप्रमुख कपिल नाळे, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, भाजपचे राहुल घाटगे, राज कापसे, कल्पेश नाळे, महावीर पोवार, सागर गौड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.