कोल्हापूर,दि.10:”महिला सशक्तिकरण के लिए सकारात्मक परिवर्तन”
८ते १२ सप्टेंबर २०२३संमेलन उद्घाटनप्रसंगी ….
ब्रम्हाकुमारी चक्रधारी दीदी
ब्रम्हाकुमारी शारदा दीदी
अदिती सिंगल,*दिल्ली*
मिनाती बेहरा,ओडिसा
डॉ राजश्री गांधी, राजस्थान
डॉ परिन सोमाणी,लंडन
ब्रम्हाकुमारी शांती दीदी
ब्रम्हाकुमारी सविता दीदी
डॉ भारती चव्हाण, महाराष्ट्र
संमेलनासाठी भारतातील महाराष्ट्र,गुजरात, गोवा,कर्नाटक, आंध्र प्रदेश,हिमाचल प्रदेश,तामिळनाडू, राजस्थान,केरळ, मध्य प्रदेश,उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड ,दिल्ली, उत्तर प्रदेश तसेच नेपाल येथील सुमारे १०००० महिला उपस्थित होत्या.
डॉ भारती चव्हाण यांनी आपल्या भाषणामधून संमेलन आयजित केल्याबद्दल शुभेच्छा देताना महिलांना शारीरिक,बौद्धिक,आर्थिक सक्षम करणेबरोबर अध्यात्मिक सक्षम करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
महिलांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याची ब्रम्हाकुमारी विद्यालयाचा उद्देश ही महिला सक्षमीकरणासाठी काळाची गरज असल्याचे सांगितले.
महिलांमध्ये होणारे अध्यत्मिक परिवर्तन कुटुंब आणि समाजामध्ये निश्र्चितच सकारात्मक परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मानिनी फाउंडेशन ने महाराष्ट्रात सुरू केलेल्या “महिलांना सन्मान आणि अधिकार कागदोपत्री* मिळणे साठी मुलाचे समोर आईचे नाव लावण्याचा कायदा संमत व्हावा”या चळवळीची माहिती देऊन उपस्थित महिलांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालय आणि उपस्थित सर्व राज्यातील महिलांनी या विषयाचे स्वागत करून हात वर करून मंजुरी दिली.*तसेच आपापल्या राज्यात या विषयाची जागृती करून मा. पंतप्रधान आणि मा. राष्ट्रपती ना निवेदन देण्याचे राज्यातील प्रतिनिधीने जाहीर केले*.
संमेलन पाच दिवसीय असुन राजयोग शिबिर,सकारात्मक परिवर्तन, मानसिक आणि भावनिक संतुलन,जीवन मूल्य आणि अध्यात्म,नैतिक मूल्य ,सशक्त आनि आनंदी कुटुंब व्यवस्था यासारख्या विषयांवरील चर्चा सत्रांचा समावेश आहे.