कोल्हापूर दि 8: कोल्हापूर आशा सेविकांचा मेळावा उत्साहात पार पडला जिल्ह्यातील सदर मेळाव्यास विशेष उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय मजदूर संघाचे असंघटित क्षेत्र प्रभारी मा. श्री. जयंतीलालजी हे उपस्थित होते. मेळाव्याची सुरूवात भारतीय मजदूर संघाच्या चालीरिती प्रमाणे जिल्हा कोषाध्यक्ष श्री. अमॄत लोहार ह्यांनी श्रमिक गीताने केली . मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. जिल्हा सचिव श्री. प्रविण जाधव ह्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व मा. एस. एन. पाटील जिल्हा अध्यक्ष ह्यांनी पाहुण्यांचे शाल गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
मा. ॲड. सौ . अनुजा धरणगावकरसो ह्यांनी प्रास्ताविक केले व १७ सप्टेंबर विश्वकर्मा दिनाची ( राष्ट्रीय श्रमिक दिन ) माहिती उपस्थितांना सांगितली. मान्यवर श्री. जयंतीलालजी ह्यांनी उपस्थितांना भारतीय मजदूर संघाचा इतिहास व प्रवास तसेच रिती निती व पध्दती ह्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. मा. जयंतीलालजीनी उपस्थित आशासेविकाना संघटनेचे महत्व समजावून सांगितले व भारतीय मजदूर संघाचे कार्य ह्याबद्दल थोडक्यात विश्लेषण केले.
सौ ज्योती तावरे ह्यांनी आतापर्यंतच्या अडीअडचणीवर कशी मात करत आपण व महाराष्ट्र राज्यात एक मोठ संघटना बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असा निश्चय केला . मा. एस. एन. पाटील जिल्हा अध्यक्ष ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर मेळाव्यास साधारणपणे ११० महिला सभासद तसेच कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा. एस. एन. पाटील, ॲड . सौ अनुजा धरणगावकरसो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा, श्री. रमेश थोरात महाराष्ट्र वीज कामगार महासंघ कोल्हापूर परिमंडळ प्रभारी, श्री. मुकुंद गुळवणी पाॅवर ट्रिलर संघ, सौ. ज्योती तावरे उपाध्यक्षा कोल्हापूर जिल्हा व सचिव आशा सेविका व गटप्रवर्तक संघ , श्री. अमॄत लोहार कोषाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा इ. हजर होते