कोल्हापूर दि 5:सामान्य व्यावसायिकाला पैश्यासाठी जी एस टी अंतर्गत केस करून कारवाईची धमकी देणाऱ्या निर्लज्ज विशाल बाबु हापटे, वय – 35 वर्षे, पद- (राज्य कर निरीक्षक) वर्ग – 02. नेमणूक (राज्यकर सह आयुक्त जी. एस.टी. भवन कोल्हापूर यांचे कार्यालय कसबा बावडा.) रा.शिवाजी तालीम जवळ,जैन बस्ती, हातकणंगले, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर या अधिकाऱ्याला रु 10000 ची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ने पकडून कारवाई केली आहे.तक्रारदार यांच्या मित्राचे टायर्स विक्री चा व्यवसाय असून त्या व्यवसायचा जी.एस.टी. भरला नाही म्हणून त्याच्यावर कारवाई न करणेसाठी आलोसे याने तक्रारदार यांचेकडे 10,000/-₹ लाचेची मागणी केली आणि ती लाच रक्कम आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून आरोपी विरुद्ध शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू आहे.
➡️ सापळा पथक प्रमुख :-श्री सरदार नाळे. (पोलीस उप अधीक्षक.)सोबत
श्री बापू साळुंके,पोलीस निरीक्षक,श्री संजीव बंबरगेकर,श्रेणी पोसई,
पोना/267/ सुधीर पाटील,मपोना/47/संगीता गावडे,पोकॉ/903/मयूर देसाई
पोकॉ/474/रुपेश माने
पोकॉ/ 2363 /संदीप पवार,चापोहेकॉ 613/सुजर अपराध ला.प्र.वि.कोल्हापूर
यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.