दि. ११-०८-२०२३:कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयातील ग्राहकांना केबल सोबतच दर्जेदार इंटरनेट सेवा देण्यासाठी भिमा रिध्दी इन्फोटेन्मेंट कंपनी कार्यरत आहे. तत्पर सेवा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर भिमा रिध्दी इन्फोटेन्मेंटने मोठी आघाडी घेतली असून, २५ हजार इंटरनेट कनेक्शनचा टप्पा पूर्ण केला आहे. या यशाबद्दल कंपनी तर्फे इंटरनेट विभागाचे कर्मचारी आणि केबलधारक यांचा आनंदोत्सव मेळावा घेण्यात आला. कंपनीचे संचालक हरिषभाई गुलाबानी आणि पृथ्वीराज महाडिक यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. त्यामध्ये ब्रॉंड बँड विभागाचे अभिनंदन करत, आता ग्राहकांना अत्यंत वेगवान इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी खास जपान मधून १२ कोटी रूपये किंमतीचा बीएनजी अत्याधुनिक सर्व्हर आणला असून, देशातील फक्त १६ कंपन्या हा सर्व्हर वापरतात. त्यामध्ये भिमा रिध्दी इन्फोटेन्मेंटचा समावेश झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हयात घराघरात प्रचंड वेगाने इंटरनेट सेवा पुरवणे शक्य होणार आहे, असे हरिषभाई गुलाबानी आणि पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितले. २००१ सालापासून कोल्हापूरसह सांगली, सातारा या तीन जिल्ह्यात भीमा रिध्दी इंम्फोटेन्मेंटचं जाळे विणले गेले आहे. खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २२ वर्षे ग्राहकांना मनोरंजनासह माहिती-तंत्रज्ञान घराघरांत पोहचवण्यात बी टीव्ही यशस्वी झाली. २०२० नंतर या कंपनीची वाटचाल पृथ्वीराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा रिध्दी ब्रॉडबँडने उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यानंतर अत्याधुनिक आणि गतीमान सेवा पुरवण्याकडे कंपनीची वाटचाल सुरू आहे. त्यातून पुढचा टप्पा म्हणून जिल्हयातील ग्राहकांसाठी आयपी टिव्ही सेवेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. आयपी टिव्हीची सेवा घेणार्या ग्राहकांना त्यांच्या टिव्हीवर इंटरनेट आणि केबलसह ओटीपी प्लॅटफॉर्मची सेवा एकत्रीत मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात घराघरात आयपी टिव्ही सेवा पोचेल, असे पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नव्या इंटरनेट ग्राहकांसाठी भिमा रिध्दी कंपनीने आकर्षक ऑफर सुरू केली असून, त्यामध्ये २ हजार ४९९ रूपयांमध्ये ६ महिन्यासाठी २५ एमबीपीएस प्रमाणे गतीमान इंटरनेट सेवा दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे ही सेवा घेणार्या ग्राहकांना फ्री इन्स्टालेशन मिळेलच, शिवाय त्यांच्या घरी मराठी चित्रपट आणि मालिकांमधील अभिनेते सरप्राईज व्हिजीट करून, त्यांच्या इंटरनेट सेवेचा शुभारंभ करणार आहेत, असेही सांगण्यात आले. या मेळाव्यात ग्राहकसेवेमध्ये लक्षवेधी कामगिरी करणार्या स्नेह ज्योती केबल नेटवर्कचे राजेंद्र मगदूम, व्यंकटेश केबल नेटवर्कचे अमर झावरे, भिमा रिध्दी नेटवर्कचे अमानुल्ला मोमीन, पद्मा डिजिटल नेटवर्कचे दर्शन शेडबाळे, वाळवा नेटवर्कचे चंद्रकांत परीट, मुरगूड नेटवर्कचे अमर देवळे, कृष्णात चौगले या ऑपरेटर्सचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेखर पाटील, रोहित कोकीतकर यांनी कंपनीच्या उद्दिष्टांबाबत माहिती दिली. या मेळाव्याला जिल्हयातील केबल ऑपरेटर्स आणि इंटरनेट विभागाचे कर्मचारी उपस्थित होते