कोल्हापूर दि 11
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीचे दिनांक 25 जून, 2018 रोजी कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 8 अन्वये नोंदणीकरण करण्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनी मार्फत मराठा, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवगाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची कालबध्दतेने व प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी 06 विभागीय कायालयांची (मुंबई, नाशीक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद व पुणे) स्थापना करण्यात आली आहे.
शासन आदेश:- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशशक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेमार्फत मराठा, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षीत गटामधल्या विशेष उपक्रम योजना सुरु असून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार यांना सारथी संस्थेचे तालुका समन्वय अधिकारी, उप विभागीय स्तरावर उप विभागीय अशधकारी यांना उप विभागीय समन्वय अधिकारी तसेच जिल्हास्तरावर शनवासी उप जिल्हाधिकारी यांना जिल्हा समन्वय अधिकारी व विभागीय स्तरावर उपायुक्त (महसुल), विभागीय आयुक्त कायालय यांना विभागीय समन्वय अशधकारी म्हणून या आदेशाद्वारे घोषित करण्यात येत आहे. 2. सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक 202308101819543719 असा आहे. त्यामुळे सदर आदेशाने सारथीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार असून लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.