कोल्हापूर दि 10
नाशिक येथे असणाऱ्या सर्वपरिचित यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बनावट पदविका देऊन सुमारे 20 जणांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.तसेच पॅरा मेडिकल कोर्सेसच्या बनावट गुणपत्रिकांचे सुद्धा वाटप केल्याची माहिती उजेडात आली आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडली आहे.त्यामुळे पदविका च जर बनावट मिळू लागल्या तर शिक्षणावरचा विश्वास कसा राहील असा सवाल जनमानसातून उपस्थित केला जात आहे.या प्रकरणी चार संशयितांवर नाशिक तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.