कोल्हापूर दि 10:डी वाय एस पी,राजारामपुरी पोलीस स्टेशनचे माजी पोलीस निरीक्षक ते ए सी पी पर्यन्त कार्यकाळ उत्तम प्रकारे पूर्ण करणारे राष्ट्रपती पदक विजेते श्री.पंढरीनाथ मांढरे साहेब यांचे आज दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी सात वाजता दुःखद निधन झाले. एक कृतीशील आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून श्री मांढरे साहेब यांच्याकडे पाहता येईल.निवृत्तीनंतर सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे हे व्यक्तिमत्व होते. पोलीस दलातील जवळपास 3000 निवृत्त पोलीस कुटुंबांचा एक परिवार करून त्याचे प्रमुख म्हणून मांढरे साहेबानी यशस्वी कामकाज केले आहे.त्यांच्या पोलीस दलाच्या अगदी पी आय पासूनच्या कारकिर्दीत त्यांनी अनेकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य मित्रांना आज हा धक्काच म्हणावा लागेल.उद्या दिनांक 11 ऑगस्ट 203 रोजी अंत्यदर्शन राहत्या घरी शुक्रतारा अपार्टमेंट महावीर कॉलेज समोर नागाळा पार्क येथे सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत आहे. तसेच अंत्यविधी साहेबांच्या गावी लिंबाची वाडी तालुका शिरवळ जिल्हा सातारा येथे आहे.