कोल्हापूर दि 9
शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी अब की बार किसान सरकार हे ब्रीद घेऊन भारत राष्ट्र समिती(बी आर एस) महाराष्ट्रात पदार्पण करत आहे.या पार्श्वभूमीवर आज इस्लामपूर येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला तेलंगणा चे मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाही.त्याऐवजी महाराष्ट्राचे प्रभारी वामशीधर राव हे उपस्थित होते.या मेळाव्यात मार्गदर्शन करताना रघुनाथ दादा पाटील यांनी दोन कारखान्यातील अंतर कमी करण्याची अथवा टनाला 5000 रु दर देण्याची मागणी करण्यासाठी साखर आयुक्त पुणे यांच्या समोर 2 ऑक्टोबर ला सत्याग्रह करण्याची घोषणा केली आहे.यावेळी वामशीधर राव यांनी सांगितले की तेलंगणा मध्ये शेतकऱ्यांचे सर्वांगीण हित साधले जात आहे परंतु महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा विषय सर्वाधिक चिंतेचा बनला आहे.इकडे बी एस आर सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या सह वंचित असलेल्या वर्गाला सुद्धा विविध अनुदानाच्या योजना प्रदान करत आहे.त्याप्रमाणेच तेलंगणाच्या धर्तीवर वेगवेगळ्या अनुदानाच्या योजना सत्ता आल्यास महाराष्ट्रात लागू करणार असल्याने सर्वांनी बी आर एस या पक्ष्याला साथ देण्याचे आवाहन केले आहे.तेलंगणा मध्ये शेतकरी आत्महत्या पूर्णपणे कमी झाल्या असून त्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बी आर एस ने कंबर कसली असल्याचे सांगितले.या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत असून रघुनाथ दादा पाटील यांच्या पाठीशी सर्व शेतकरी उभा राहणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.तसेच येणाऱ्या काही दिवसात तेलंगणा चे मुख्यमंत्री के सी आर यांच्या सभा होणार असून दुसरीकडे सभासद नोंदणी जोरात सुरू असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पुणे समन्वयक बी जी देशमुख यांनी सांगितले.या मेळाव्याला शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील,पुणे जिल्हा समन्वयक बी जी देशमुख,किसान सेलचे प्रदेश अध्यक्ष माणिकदादा कदम,महाराष्ट्र कार्याध्यक्ष कालीदास आपेट,उपाध्यक्ष ऍड अजित काळे,कोल्हापूर जिल्हा संघटक राजेश उर्फ बाळ नाईक,कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रोफेसर तोहीद बक्षु,सांगली जिल्हा महिला संघटक शर्वरी पवार यांच्यासह असंख्य शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.