कोल्हापूर (जिमाका) दि.09: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ कार्यक्रमाची पंच प्रण शपथ घेऊन सुरुवात झाली. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना शपथ दिली. यावेळी उपस्थितांनी हातात माती घेवून शपथ घेतली.
भारताला 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसीत देश बनवण्याचे स्वप्न साकारू. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगू. भारताची एकता अधिक मजबूत करू, देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान ठेवू. नागरिक म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडू अशी शपथ घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन शक्ती कदम, करवीर उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, इतर विभाग प्रमुख, तहसिलदार, नायब तहसिलदार, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हयात ठिकठिकाणी सर्व शासकीय कार्यालयात पंच प्रण शपथ घेवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ कार्यक्रमाची सुरुवात झाली.