दिनाक ०८ ; शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 प्रोत्साहन पर लाभ योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्याच्या शासनाच्या योजनेचा पांढरपेशी लेखापरीक्षकांच्या नाकर्तेपणामुळे बोजवारा उडलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मनसे कोल्हापूरतर्फे जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण पाटील यांना शेतकऱ्यांसह घेराव घालण्यात आला.
सदर प्रोत्साहन पर लाभ योजनेअंतर्गत सन 2017 18, 2018 19 व 2019 20 या तीन पैकी दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभाची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे.
या संदर्भी महाराष्ट्र शासनाने मा.राज्यपालांच्या आदेशाने सहकार,पणन व वस्रोदयोग विभागातर्फे दिनांक 29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय क्रमांक प्रोअयो ०६२२ / प्र. क्र. ७२ /२ – स द्वारे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी प्रामाणिक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आदेश काढलेला आहे. मात्र पांढरपेशी अधिकारी व पांढऱ्या सदऱ्याच्या पुढार्यांनी गाव पातळीवरील राजकारणातून जाणीवपूर्वक प्रामाणिक शेतकऱ्यांना डावलून धन दांडग्यांना या योजनेचा लाभ दिल्याचा आरोप जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी केला.
या गैरप्रकारामध्ये शासकीय लेखापरीक्षक सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून शासन निर्णय व मार्गदर्शक निकषांना तिलांजली देऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या वर अन्याय करीत आहेत. माय मातीमध्ये झालेल्या नुकसानीच्या तुलनेत मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीसाठी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारायला लावून शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या पांढरपेशी लेखापरीक्षकांनी शासनाकडे पाठवण्यात येणाऱ्या याद्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी दाखवून दिले.
यावेळी आरे गावातील शेतकऱ्यांना राजकीय दृष्ट्या बाजूला ठेवून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याने ९ शेतकऱ्यांना पुनःश्च लेखापारीक्षण करून लाभ देण्याचे अभिवचन जिल्हा विशेष लेखापारीक्षक किरण पाटील यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी प्रकाश वरुटे , संभाजी देवकर, धनाजी देवकर, संजय देवकर, सागर वरुटे, पंडित देवकर, संदीप वरुटे सौ कमल गोविंद वरुटे, सौ कमल मधुकर वरुटे , श्रीमती शांताबाई दगडू वरुटे, निवास वरुटे इत्यादी आरे गावातील शेतकरी उपस्थित होते.
शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलन प्रसंगी उत्तम वंदुरे,प्रसाद साळोखे,राजन हुल्लोळी, अमित बंगे,शरद जाधव,अमर कंदले,यश लाड,अरविंद कांबळे,अमित साळोखे, निलेश आजगावकर, गणेश शिंदे, निलेश तमाईचिकर,अभिजीत संकफाळ, सुधीर कोठावळे इ. मनसे पदाधिकारी उपस्थित होते