दिनांक०७.०८.२०२३:मणिपूर येथे मैतेई व कुकी नागा व इतर आदिवासी जमातीमध्ये गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. कुकी समाजातील दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची विटंबना करण्यात आली. या घटनेतील आरोपींना शिक्षा द्यावी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मनिपुरचे मुख्यमंत्री एन बीरेनसिंह यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
गेल्या दोन महिन्यापासून मनिपुर जळत आहे. महिलावर अत्याचार सुरू आहेत. मैतेई समाजाला संरक्षण देऊन दंगल सुरू ठेवण्याचे काम तेथील सरकार कडून होत आहे. बेटी बचाव, बेटी पढाव चा ढोल वाजवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र परदेश वाऱ्या करण्यात मशगुल होते. त्यांनी मणिपूरमध्ये वेळीच लक्ष घातले असते तर ही लांचनास्पद घटना टळली असती. त्यामुळे कुकी समाजातील दोन महिलांना विवस्त्र करून विटंबना करणाऱ्या वर कडक कारवाई करावी अशी मागणी महिलांनी केली आहे. यावेळी राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचा अवमान आणि आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावरही कारवाईची मागणी केली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष वासंती म्हेतर, रूपाली गायकवाड, आसमा बडखान, सुनिता गायकवाड, सीमा गायकवाड, ज्योती थोरात, मनीषा कांबळे, सरिता टोणपे, संजय गुदगे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.