कोल्हापूर दि 4
कोल्हापुरातील सेवंथ डे ऍडवेंटिस्ट या शाळेमध्ये एक विद्यार्थ्याने पेपरमध्ये जय श्रीराम लिहिल्याने शाळेतील शिक्षकांनी सदर विद्यार्थ्याला मारहाण केली आहे.याचे वृत्त समजताच हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तरी बरेच कार्यकर्ते शाळेत जमा झाले असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे.शाळा व्यवस्थापनाला चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे.याबाबत शाळा व्यवस्थापन आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांची मिटिंग सुरू असल्याचे समजते.तसेच सदरच्या शाळेत धार्मिक दुजाभाव केला जात असल्याचे समजते.ज्यामध्ये हिंदू संस्कृती नुसार मुलींना टिकली अथवा बांगड्या घालणे याला प्रतिबंध घालत असल्याचे समजते.त्यामुळे शाळा परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण बनले असून घटनास्थळी पोलीस पोचले आहेत.