कोल्हापूर दि 29
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे हे सक्तीच्या रजेच्या आदेशानंतर वैद्यकीय रजेवर गेले असल्याने त्यांच्या जागी करवीरचे शाखा अभियंता श्रीपाद बार टक्के यांची नेमणूक केली आहे, ही नेमणूक अत्यंत चुकीची असून त्यामुळे मिशन जलजीवन ची चौकशी पुन्हा आगीतून फुफाट्याकडे जाणार आहे,असे शेतकरी संघटनेचे ऍड माणिक शिंदे यांनी सांगितले.
श्रीपाद बारटक्के यांनी शिये गावचा मिशन जलजीवन चा जनरल रिपोर्ट हा अत्यंत चुकीचा तयार केला असून कोणतीही शहानिशा न करता जनरल रिपोर्टवर सही केलेली आहे.
वास्तविक शिये तालुका करवीर हे गाव पंचगंगेच्या किनाऱ्यावर असताना ते चिकोत्रा नदीच्या किनाऱ्यावर दाखवलेले आहे. तसेच शिये गावचे हद्दीमध्ये पितळवाडी, साठेवाडी, धोंनुकशेवाडी माध्याळ आधी वाड्या नसतानाही त्या शिये गावच्या जनरल रिपोर्ट मध्ये मध्ये दाखवलेल्या आहेत. तसेच शिये गावच्या पूर्वेला हातकणंगले तालुका असताना त्यांनी चिकोडी तालुका दाखवलेला आहे. तसेच शिये हे गाव कोल्हापूरच्या उत्तरेला 11 किलोमीटर असताना ते कोल्हापूरच्या दक्षिणेला 34 किलोमीटर दाखवलेले आहे. सदरची बाब ही शेतकरी संघटनेने केलेल्या माहिती अधिकारात उघड झाली असताना, त्याबाबत बारटक्के यांना जाब विचारला असता त्यांनी सदरची चूक अनावधानाने व कॉपी-पेस्ट झाल्यामुळे झालेली आहे असा लेखी खुलासा केला. व जल जीवन मिशनचे कार्यारंभ आदेश झाले असताना व काम चालू झाल्यानंतर पुन्हा जनरल रिपोर्ट बदललेला आहे. सदरची बाब ही गंभीर असून महाराष्ट्र सरकारने यामध्ये लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे अशोक धोंगे यांच्या जागी श्रीपाद बारटक्के यांना कार्यभार दिल्यामुळे चौकशी निपक्षपातीपणे होणार नाही. त्यामुळे त्यांना या जागेवरून ताबडतोब हटवावे. जर त्यांना या पदावरून हटवले तरच चौकशी निपक्षपातीने होणार आहे याची शासनाने नोंद घ्यावी.
श्रीपाद बारटक्के यांची झालेली नेमणूक म्हणजे जल जीवन मिशन ची चौकशी ही आगीतून फुफाट्यात जाणार आहे व हाती काही लागणार नाही असे एडवोकेट माणिक शिंदे यांनी प्रेस नोटद्वारे कळविले आहे.