कोल्हापूर दि 28
राज्यात शिक्षण विभागात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणातील अधिकाऱ्यांची व संबंधित सर्वांची ई डी चौकशी करण्याची घोषणा देवेंद्र फडवणीस यांनी केली आहे.शिक्षणा सारख्या पवित्र विभागामध्ये सुद्धा अधिकारी तसेच शिक्षक यांनी वेगवेगळा भ्रष्टाचार केल्याची प्रकरणे घडल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली असल्याचे दिसते.त्यामुळे शिक्षण विभागातील तथाकथित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.