कोल्हापूर दि 22
संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून राज्यात अलर्ट जारी करण्यात आले आहेत.परवाच इर्शाळ वाडी येथे डोंगर खचून कित्येक नागरिकांचा जीव गेला आहे.त्यातच आज कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळ्याजवळ तांदुळवाडी येथे डोंगर खचल्याचा प्रकार घडला आहे.1200 लोकसंख्या असलेल्या गावातील नागरिक भीतीच्या छायेत असून प्रशासनानं यात लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे