कोल्हापूर दि 10:काल काळम्मावाडी चे पाणी जॅकवेल पर्यन्त आल्यानंतर पाणीपूजन वेळी सतेज पाटील यांच्या डोळ्यात अश्रू आलेला व्हिडिओ संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याने पाहिला. पण ते अश्रू नसून आनंदाश्रूच म्हणावे लागतील.
महाराष्ट्राच्या राजकारणात सतेसाठी उलथापालथ होत असताना इकडे महाराष्ट्राच्या राजकारणातला आश्वासक सूर्य आपल्या मायभूमीला थेट पाणी पुरवठा होत असल्याने आनंदाश्रू ढाळत होता तेही आजमितीला कोणतीही सत्ता नसताना.कारण सूर्य कोण सोबत आहे-नाही यावर त्याचे उगवणे अवलंबून नसते.आज या दिवसासाठी याच कोल्हापूरच्या ”बंटी पाटील” यांनी टीका सहन केल्या आहेत.त्यामुळे कोल्हापूरचा सुपुत्र म्हणून या कामा साठी कष्ट केल्याने भावनिक होणे स्वाभाविक आहे.
पण आज महाराष्ट्रात दलबदलू आणि गटबदलू राजकारणाने वातावरण ढवळले आहे.परंतु दुसऱ्या बाजूला आजपर्यंत च्या राजकारणात पक्षनिष्ठ असणाऱ्या सतेज पाटील यांनी तमाम कोल्हापूरकरांच्या मनात आज घर केलं आहे.आज सतेज नावाच वादळ जरी शांत असलं तरी येणाऱ्या काळात ते आपली ताकद दाखवून देईल आणि त्यांना साथ ही कोल्हापूरची स्वाभिमानी जनता देईल यात शंका नाही.आजपर्यंत सतेज पाटील म्हणजे हुकुमी एक्का म्हणून सिद्ध झाले आहेत.त्यामुळे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री म्हणून “आपला बंटी” बघायचे भाग्य तमाम कोल्हापूर कराना मिळेल यात शंका नाही.त्यासाठी एकनिष्ठ असणाऱ्या या सुर्या सारख्या नेत्याला कोल्हापूरकर नक्कीच साथ देतील.आज कोल्हापूर जिल्ह्यात प्रामाणिक आणि खमक्या म्हणून सतेज पाटील यांचेच नाव आघाडीवर आहे.सतेज पाटील यांनीसुद्धा ई डी चा अनुभव घेतला आहे.पण “कर नाही त्याला डर कशाला” म्हणत त्यांच्यावर पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवायची कधी वेळच आली नाही,हाच खरा “कोल्हापुरी स्वाभिमान” म्हणावा लागेल.आता लवकरच महानगरपालिका, विधानसभा,लोकसभा येत आहे.बंटी पाटील नावाचं वादळ कोल्हापूरकरांच्या मदतीने धुमाकूळ घालून यशाची पताका लावणार हे निश्चित.त्यामुळे आजघडीला कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या राजकारणात अभिमान वाटेल असा एकमेव नेता म्हणजे फक्त सतेज पाटील आहेत हेच सत्य आहे असे म्हणायला हरकत नाही
-सचिन देसाई
कसबा बावडा,कोल्हापूर