कोल्हापूर दि ९. :रोटरी डिस्ट्रिक्ट (3170) चे नवनिर्वाचित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. नासिर बोरसादवाला यांचा पदग्रहण सोहळा, रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनल चे पास्ट इंटरनॅशनल प्रेसिडेंट रो.शेखर मेहता उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनचे नवनिर्वाचित प्रेसिडेंट रो. शरद पाटील आणि सेक्रेटरी रो. रितू वायचळ यांचाही पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता हॉटेल द पॅव्हिलियन येथे होणार आहे तरी कोल्हापूरच्या सर्व रोटेरीयन यांनी उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे प्रेसिडेंट रो.राजेंद्र पोंदे, सेक्रेटरी रो.अमर शेरवाडे (2022/23) आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.