कोल्हापूर दि 30
इनर व्हील कोल्हापूर हेरिटेज च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना आज शालेय बॅग चे वाटप करण्यात आले.महानगरपालिकेच्या शाळा नंबर 8 शिवाजी पेठ येथे हा कार्यक्रम पार पडला.इनर व्हील तर्फे दरवर्षी शालेय विद्यार्थी,गरजू महिला तसेच समाजातील निराधार महिलांना मदत करीत असल्याचे अध्यक्षा पल्लवी मूग यांनी सांगितले.शालेय विद्यार्थ्यांना बॅग मिळाल्यामुळे मुलांच्यात आनंदाचे वातावरण पसरले होते.या कार्यक्रमाला पूजा शिंदे,धनंजय सराटे,योगिता बागे,सेजल शहा व शिक्षक वृंद उपस्थित होते