दिनांक२८: विधि व न्याय विभाग (खुद्द) मध्ये कार्यरत अधिकारी/ कर्मचारी
विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील धर्मादाय आयुक्त महाप्रशासक आणि शासकीय विश्वस्त तसेच निबंधक भागीदारी संस्था या कार्यालयांमधील कार्यरत अधिकारी यांचे वयाच्या ५०/५५
व्या वर्षापलिकडे किंवा अर्हताकारी सेवेच्या ३० वर्षानंतर सेवेत
राहण्याच्या पात्रापात्रता आजमावण्यासाठी विभागीय पुनर्विलोकन
समिती व अभिवेदनावर विचार करण्याकरिता विभागीय अभिवेदन
समिती पुनर्गठीत करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
विधि व न्याय विभाग
शासन निर्णय क्रमांका संकीर्ण ४३१ ९/ प्र.क्र .८२/ १ ९/ दोन-अ
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
तारीख २७ जून, २०२३
पहा:
१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एलपीएल- २०१७/ प्र.क्र .२१/ का -१५, दि .१० जून २०१ ९.
२) शासन निर्णय, विधि व न्याय विभाग, क्रमांक: संकीर्ण ४३१ ९/ प्र.क्र .८२/ १ ९/ कार्यासन २-अ दि .० ९ .०१.२०२०.
प्रस्तावना:
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १ ९ ८२ च्या नियम १० (४) व नियम ६५ अनुसार सार्वजनिक
हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी/ कर्मचा-यांना वयाच्या ५०/५५ व्या वर्षी अथवा ३० वर्षे
अर्हताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी त्यांची सेवा पुनर्विलोकन करण्यासंदर्भात शासनाचे धोरण होते.
त्यानुषंगाने संदर्भ क्र. २ च्या शासन निर्णयान्वये विभागीय पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली होती.
सामान्य प्रशासन विभागाने संदर्भ क्र .१ मध्ये नमूद शासन निर्णयान्वये पूर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित करुन
पुनर्विलोकन कार्यपध्दतीसंदर्भात तरतुदी केल्या आहेत. सदर शासन निर्णयामध्ये खालील तरतुदी आहेत.
1) गट-अ आणि गट-ब राजपत्रित अधिकारी:
अ) शासन सेवेत वयाच्या ३५ व्या वर्षापूर्वी आलेले अधिकारी/ कर्मचारी:
सामान्य प्रशासन विभागाच्या सुधारित धोरणानुसार शासन सेवेत वयाच्या ३५ व्या वर्षापूर्वी आलेल्या गट- ” अ” आणि
गट- ” ब” च्या राजपत्रित अधिका-यांचे त्यांच्या वयाची ५० वर्षे पूर्ण होतेवेळी किंवा त्यांच्या अर्हताकारी सेवेची ३०
वर्षे पूर्ण होतेवेळी यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी एकदाच पुनर्विलोकन करावयाचे आहे.
ब) शासन सेवेत ३५ वर्षानंतर सेवेत आलेले अधिकारी/ कर्मचारी:
शासन सेवेत ३५ वर्षानंतर सेवेत आलेल्या राजपत्रित अधिका-यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी पुनर्विलोकन करावयाचे आहे.
1) गट-ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड चे कर्मचारी:
गट- ” ब” (अराजपत्रित), गट ” क” आणि गट ” ड” कर्मचा-यांच्या बाबतीत त्यांच्या वयाच्या ५५ व्या
वर्षी किंवा त्यांच्या अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण होतेवेळी यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा पुनर्विलोकन करावयाचे आहे.
पुनर्विलोकन करताना शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांची शासन सेवा पुढे चालू ठेवण्याची पात्रापात्रता
आजमावण्यासाठी विहित निकषांच्या आधारे त्यांचे पुनर्विलोकन करुन, सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी/ कर्मचारी
यांनाच लोकहितास्तव शासन सेवेत पुढे चालू ठेवावयाचे आहे व अकार्यक्षम तसेच संशयास्पद सचोटी असणा-या
अधिकारी/ कर्मचारी यांना मुदतपूर्व सेवानिवृत्त करावयाचे आहे.