दिनाक २७ ; भाजपाचे लाडके खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार जुना बुधवार पेठेतील राहुल घाटगे सरकार व मित्रपरिवार त्यांच्या ग्रुप कडून गरजू विद्यार्थी विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त 150 डझन वह्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला उद्योजक सतीश जोंधळे, राजेंद्र काकडे, घनश्याम घोडके, सुजित मरळकर, विजय लोखंडे, बाबुराव चव्हाण,संदीप डोईफोडे,राकेश घाटगे, प्रकाश जाधव,चेतन शिंगटे, प्रणव पोवार, रवींद्र पवार सुनील कांबळे, व राहुल घाटगे सरकार यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा कार्यक्रम मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अर्बन बँकेचे माजी कर्मचारी सुरेश चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.