दिनांक२६:कोरोना काळामध्ये ज्या मुलांचे आई किंवा वडील अथवा दोघेही गमावले असतील तर त्या मुलांच्या शिक्षणासाठी व खर्चासाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे जास्तीत जास्त 10000 रु मदत देण्यात आली आहे.यासाठी जिल्ह्यातील 764 मुले पात्र झाली आहेत.तसेच अजून 30 जूनपर्यंत अशा मुलांना लाभ देण्यात येणार आहे.
कोरोनामुळे अनेक मुलांचे आई वडील गमावल्याने त्यांचा आधारच नाहीसा झाला.त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सर्वोच न्यायालयाने आशा मुलांना आर्थिक मदत देण्याचा आदेश दिला.त्याअनुषंगाने शासनाकडून 10000 मदत दिलीत जात आहे.अश्या पात्र मुलांची संख्या जवळपास 1100 च्या घरात असून त्यापैकी 764 मुलांनी लाभ घेतला आहे.उर्वरित मुलांसाठी 30 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.त्यासाठी मृत पालकांचे कोरोना सर्टिफिकेट, बोनफाईड,बँक पासबुक,रीतसर अर्ज,मृत्य दाखला, मुलाचे आधार कार्ड ई कागदपत्रे घेऊन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कसबा बावडा येथील महिला व बालकल्याण विभागाला संपर्क साधावा.