दिनांक२४: कोल्हापूर जिल्ह्यातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी आपली पत्नी आणि मुलासह शुक्रवारी रात्री विष प्राशन केल्यानतंर गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.अगदी अल्पावधीत औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे शिंदे यांनी आपली पत्नी आणि मुलासह शुक्रवारी रात्री विष प्राशन केल्यानतंर गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तणावाखाली गेले होते. या तणावातून त्यांनी स्वत:सह कुटुंबाचा शेवट केला आहे. या घटनेनंतर गडहिंग्लज शहरावासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.