दिनांक२३:Kolhapur News: कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारी 29 जून रोजी गुरुवारी होणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगलीसह सीमाभागातील 200 हून अधिक वारकरी होतील.कोल्हापुरातील मिरजकर तिकटीपासून विठ्ठल मंदिरापासून सकाळी साडेसातला पायी दिंडी सुरु होईल. आषाढीच्या पूर्वसंध्येला दुपारी तीनला नाथा गोळे तालीम मंडळ चौकातून विठ्ठल मंदिरामार्गे नगरप्रदक्षिणा होईल.सहभागी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. दिंडी सोहळ्यात दोन अश्वही सहभागी होणार आहेत. भगवान शामराव तिवले हे चोपदार म्हणून जबाबदारी पार पाडतील. नंदवाळ हे प्रति पंढरपूर म्हणून परिचित आहे.खंडोबा तालीम व खंडोबा देवालयाकडून पालखीवर बेल, भंडारा व फुलांची उधळण केली जाणार आहे.