कोल्हापूर, दि. 21 (जि.मा.का.) : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12वी पदवी पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनार्थ ‘अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’ देण्यात येणार असल्याचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांनी कळविले आहे.
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे- उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, ओळखपत्राच्या आकाराची 2 छायाचित्रे, पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेला पुरावा इ. या कागदपत्रांसह अर्ज दिनांक 15 जुलै 2023 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, डॉ. बाबर हॉस्पीटलच्या मागे, सदर बजार, ताराराणी पुतळ्याजवळ, कोल्हापूर या कार्यालयात सादर करावा.