दिनांक२० :छत्रपती शिवाजी उद्यमनगर येथे पार्वती टॉकीज कडे पेट्रोल पंपाला लागून जाणाऱ्या रस्त्यावर चारचाकी वाहने लावल्याने एका वेळी एकच चारचाकी जाऊ शकत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करून वादवादीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.समोरासमोर वाहने आल्याने कोणी गाडी मागे घ्यायची यावरून वाहन चालकांच्या मध्ये वादावादी होऊ लागली आहे. या परिसरात कार ऍक्सेसरीज ची दुकाने असल्याने त्यांच्या ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावरच लावून काम सुरू असल्याने विनाकारण लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत शहर वाहतूक नियंत्रण शाखेने लक्ष घालून सदर रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी त्वरित थांबवण्याची मागणी होऊ लागली आहे.