कोल्हापूर दि 19
*विविध शासकीय व निमशासकीय विभागामध्ये सर्व सामान्य नागरिकांच्या कडे कामासाठी लाच मागणे हे काय नवीन नाही.परंतु याबाबत तक्रारीसाठी नागरिकांनी निःसंकोचपणे पुढे यायला पाहिजे.त्याबाबत तक्रार दिल्यास त्वरित कारवाई केली जाईल व तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणेत येईल असे आवाहन लाच लुचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांनी सर्वसामान्य जनतेला आवाहन केले आहे.तसेच या विभागामार्फत ठिकठिकाणी बोर्ड लावणे,जनजागृती पर मार्गदर्शन व्याख्यान असे आयोजन करून सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये तक्रारी साठी जनजागृती निर्माण करण्यात येत आहे.