कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी रात्रभर हत्तीच्या मागावर
कोल्हापूर दि 22
गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी चा परिसर तसा डोंगरमाथ्यासह शिवाराचा या परिसरात यापूर्वी सुद्धा गवे, रानडुक्कर,हत्ती अश्या प्राण्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण नेहमीच असते.त्यातल्या त्यात एखादा हत्ती आला तर त्याला आवरणे खूप अवघड असते.अश्या परिस्थितीत या पशु प्राण्यांचा सुद्धा बंदोबस्त ची जबाबदारी नेसरी पोलीस सातत्याने घेताना दिसत आहेत.त्या अनुषंगाने गुरुवारी रात्री एका हत्तीचा थरार नेसरीने अनुभवला.हत्ती म्हटले की भल्याभल्यांना घाम फुटतो त्यात काही अतिहौशी कार्यकर्ते त्या हत्तीला हुसकावल्याने कधी कधी हत्ती बेफाम होऊन दिसेल त्याला चिरडण्याच्या घटना घडल्या आहेत.
अश्या बिकट परिस्थितीत नागरिकांना आवर घालत प्रसंगी जीव धोक्यात घालून पोलीस,वनरक्षक व ग्रामस्थ यांना जबाबदारी घ्यावी लागते.त्याप्रमाणे नेसरी पोलीस स्टेशनचे संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व वनरक्षक जितेंद्र साबळे प्रवीण बेलवलेकर वनसेवक शिवाजी मटकर संभाजी पाटील माजी सरपंच प्रकाश दळवी माजी उपसरपंच प्रथमेश दळवी लक्ष्मणराव शिंगटे, दयानंद बोरगल्ली,संदीप मुळीक आदींच्या सहकार्याने रात्री 12 ते अगदी पहाटे 5 वाजेपर्यंत डोळ्यात तेल घालून गावाची आणि नागरिकांची सुरक्षा करण्याचे काम या सर्वांनी केले आहे.यामध्ये त्या हत्तीने ऊसपीक,पाण्याच्या टाक्या, भाताच्या पोत्यांचे नुकसान केले आहे.परंतु कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी दक्षतेने या सर्वांनी काम केलेने तो धोका टळला.त्यामुळे पंचक्रोशीमध्ये पोलीस दलासह वनखाते ग्रामस्थ या सर्वांचे कौतुक होताना दिसत आहे.