आयुबभाईजमादार फौंडेशन कोल्हापूर,यांचेवतीने
महान गायक स्व. महंमद रफी यांच्या, 100 व्या वाढदिवसा निमित्याने गायक डॉ.अमन पठाण यांनी दुपारी बारा वाजले पासून रात्री दहा वाजेपर्यंत महंमद रफी यांची शंभर गाणी गावून
एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला, सुरवातीला रफी साहेबांच्या फोटोस, अरुण आवटे काका, व भन्नाट न्यूज कोल्हापूर चे संपादक धीरज रुकडे ,अमीर भाई यांनी हार अर्पण केला,
व त्यानंतर डॉ. अमन पठाण यांनी गायनाला सुरवात केली, यामध्ये, काही युगल गीते, सोलो हिंदी, मराठी, गाणी गायली,
शेवटी रात्री दहा वाजता शंभर गाणी झाल्यानंतर डॉ. अमन पठाण यांचा डॉ. अशोकराव साळोखे, डॉ. पी. एम. चौगुले, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
याप्रसंगी दिलीपराव माने, जयंत पाटील, मोहीते साहेब,प्रवीण सासने,डॉ.विजथकुमार जाफळेकर,डॉ.संदीप पाटील व शिवाजी पेठ, संध्यामठ, येथील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते., गजानन गजगेश्वर, व संजय ठाणेकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले