कोल्हापूर दिनांक 25 -कोल्हापूर पंचगंगे चा घाट इथे रोज शेकडो अशा ट्रॅव्हल्स , सहली च्या बसेस थांबतात मोठी जागा आहे , पाणी मुबलक आहे जेवण तिथे बनवून जेवणारी ही फार आहेत पण साधी वॉशरूम ची सोय तिथे नसल्याने नाईलाजस्तव लोकांना उघड्यावर टॉयलेटला बसायला लागते .त्यामुळे स्कूल कॉलेज च्या मुलें मुली , चांगल्या फॅमिली मधील ज्येष्ठ नागरिक अशा ट्रिप मध्ये असतात , त्यांच्या फार अडचणी चे होते कोल्हापूर महानगरपालिके ने या कडे लक्ष देवून फिरते एक दोन टॉयलेट इथे उभे करावीत आणी यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा.सुट्ट्यांचा काळ असल्याने सहली येत असतात मुले मुली या अवस्थेत कुठे शौचालयासाठी जाणार हा गंभीर प्रश्न आहे.कोल्हापूर मध्ये येणाऱ्या भाविकांना या किमान सेवा आपण देऊ शकत नसलो तर काय उपयोग आहे.त्यामुळे महानगरपालिका अधिकाऱ्यांना रास्ता रोको केल्यावरच जाग येणार का असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.त्यामुळे ताबडतोब याचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.