भन्नाट न्युज नेटवर्क
सातारा : ‘आलेली पेन्शन तुम्ही एकटेच खाता, मला का देत नाही’ असे म्हणत त्यांच्या मुलाने निवृत्त डीवायएसपी बापाला बेल्ट व काठीने बेदम मारहाण केली .ही धक्कादायक घटना शाहूपुरी परिसरात गुलमोहर कॉलनीत दि.१८ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली.
याप्रकरणी मुलासोबत त्याच्या आईवरही शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशिष बाबासाहेब गोडसे (वय ३९)व रेखा बाबासाहेब गोडसे ( वय ५८)अशी गुन्हा दाखल झालेल्या मायलेकांची नावे आहेत .याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दादासाहेब वामन गोडसे (वय ६७ रा.अनुसया गुलमोहोर कॉलनी,शाहूपुरी,सातारा)हे पोलीस दलातून डीवायएसपी पदावरून निवृत्त झाले आहेत.