भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यात 81 टक्के ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, उर्वरित
लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण लवकरात
लवकर स्वत: pmkisan.gov.in या संकेतस्थळावरुन जाऊन फार्मर कॉर्नर या ठिकाणी ई-केवायसी मध्ये आधार
नंबर टाकून पुढे येणाऱ्या निर्देशांचे पालन करुन ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी. महा ई-सेवा केंद्रामधून ई-
केवायसी करुन घेता येणार असून पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांनी याचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी
ची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पीएम किसान योजनेचे प्र. नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी
भगवान कांबळे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) पोर्टलवरील जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र
लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील
सर्व पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किवा बायोमॅट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.
पी.एम.किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात
आली असून वेळोवेळी त्यांना याबाबत अवगत करण्यात आले आहे, असेही श्री. कांबळे यांनी सांगितले आहे.