भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुसिबेन शाह व
सदस्य अॅड. निलिमा चव्हाण, अॅड. संजय सेंगर, अॅड. प्रज्ञा खोसरे, अॅड. जयश्री पालवे, सायली पालखेडकर,
चैतन्य पुरंदरे हे दिनांक 28 व 29 मार्च 2023 हे दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत असून दौ-या दरम्यान
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयातील आयोगातील प्रलंबित प्रकरणांची सुनावणी व इतर विभागांचा आढावा
घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली.
मंगळवार, दि. 28 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते 1 वाजता डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन मुलांचे
निरिक्षणगृह/बालगृह, मंगळवार पेठ, पाण्याचा खजिन्याजवळ, कोल्हापूर- 416012 येथे प्रलंबित प्रकरणांची
सुनावणी. दुपारी 1.30 ते 2.30 यावेळेत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कोल्हापूर, सांगली, सातारा या
जिल्ह्यातील बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळाचे सदस्य यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी
3.30 ते 4.30 या वेळेत डॉक्टर असोसिएशन व लिडिंग कॉलेज यांना भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांसोबत सदिच्छा
भेट घेणार आहेत.
बुधवार, दि. 29 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता होणा-या दौ-याच्या तपशीलानुसार जिल्ह्यातील
SJPU, बाल कल्याण समिती, कोल्हापूर, सदस्य, बाल न्याय मंडळ सदस्य, कोल्हापूर, सर्व अधीक्षक/ अधीक्षिका,
अनुदानित/विनाअनुदानित बालगृहे, चाईल्ड लाईन (सिटी) व इतर बालकांच्या क्षेत्रात काम करणा-या संस्था
मागील बाल कल्याण समिती अनुभव शेअरींगसाठी, शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक (दोन्ही) समाज
कल्याण विभाग, आदिवासी विभाग, कामगार विभागाचे अधिकारी इ. समवेत शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर
येथे आढावा बैठक. दुपारी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व जिल्ह्यातील बार कौन्सिल यांच्या प्रतिनिधीं
समवेत भेट.