भन्नाट न्युज नेटवर्क
व्हीनस कॉर्नर तसा कोल्हापूरकरांना परिचित असलेला परिसर आणि त्याला कारण ही अगदी कला क्षेत्रातील म्हणजे व्हीनस टॉकीज वर्षानुवर्षे या थिएटरमध्ये तमाम कोल्हापूरकरांनी विविध सुपरहिट पिक्चर चा मनमुराद आनंद लुटला.कालांतराने ती टॉकीज बंद झाली असली तरी व्हीनस नावाच्या त्या शब्दाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कालांतराने या चौकात मातोश्री प्लाझा चे बांधकाम झाल्याने या चौकाला एक वेगळे वैभव प्राप्त झाले ते म्हणजे या इमारतीत असणाऱ्या पी एन बी पुरुषोत्तम नारायण गाडगीळ यांच्या ज्वेलरी च्या शोरूम मुळे त्यानंतर मलबार सारखा ब्रँड सुद्धा याच इमारतीत आला आणि बघता बघता व्हीनस कॉर्नर झळाळू लागला.तसेच जोग व ब्लू डायमंड शोरूम सुद्धा उषा टॉकीज ला लागून सुरू झाले.त्यानंतर व्हीनस टॉकीज परिसराला लागून अलीकडेच “कल्याण ज्वेलर्स” सारखा ब्रँड सुद्धा अख्या चार पाच मजली इमारतीत दाखल झाला आणि व्हीनस कॉर्नर हा ज्वेलरी उद्योगाचा बेताज बादशहा बनला.
आता अलीकडेच समोरच्या बाजूला “सोनचाफा”आणि “रेग्सन”सुद्धा आला आहे त्यामुळे सर्वसामान्य पासून अगदी श्रीमंत लोकांसाठी चे ज्वेलरी शोरूम इथे सुरु झाले.तसेच अगदी नवीन म्हणजे “ओरा” नावाचा ब्रँड सुद्धा दख्खन हॉटेल समोर सुरू झाला आहे.
आता व्हीनस कॉर्नर पुरक्षेत्र असून सुद्धा इथे करोडो रुपयांची गुंतवणूक करून शोरूम कसे काय उभा रहात आहेत हे सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे.याचे उत्तर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्वेलरी व्यवसायात ज्या वास्तू मध्ये पाणी येते ती व्यवसायासाठी शुभ मानली जाते आणि त्या व्यवसायाची भरभराट होते.त्यामुळेच की काय सणासुदीला या परिसरातील शोरूम्स अगदी गर्दीने फुलून गेलेले असतात.त्यामुळे येणाऱ्या काळात या परिसरातील रहिवासी अथवा व्यापारी जागा फक्त ज्वेलरी साठी खुल्या झाल्या तर नवल वाटायला नको.