भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): प्लास्टिकचा मानवी जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन
भाविकांकडून प्रसादासाठी होणारा प्लास्टिक बॅगेचा वापर टाळण्यासाठी भारतीय डाक विभागामार्फत पश्चिम
महाराष्ट्र देवस्थान समितीला पर्यावरणपूरक १० हजार कापडी प्रसादाच्या पिशव्या भक्तांना देण्यासाठी सुपुर्द
करण्यात आल्या असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत
किरण बनसोडे, कोल्हापूर डाक विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे यांच्या हस्ते व सहा. सचिव शितल इंगवले,
व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. कार्यक्रमासाठी उपविभागाचे सहाय्यक
अधीक्षक दत्ता मस्कर, तक्रार निवारण डाक निरीक्षक निळकंठ मंडल, राजेंद्र पाटील, अमोल शिंदे व इतर मान्यवर
उपस्थित होते.