भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): कोल्हापूर जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करुन 24 मार्च हा दिवस
क्षयरोग विजय दिवस म्हणून साजरा होण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रख्यात
मधुमेह तज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.चंद्रकांत कणसे, डॉ. सरस्वती कणसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.
उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.बी.थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय
राजवीर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या टीबी ऍण्ड चेस्ट विभाग प्रमुख डॉ.अनिता सैब्बनावार, माहिती
अधिकारी वृषाली पाटील, डॉ.मानसी कदम, डॉ,विनायक भोई, डॉ.मोहन पोतदार, दीपा शिपुरकर, डॉ. नितीन
कुंभार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
सन 2019 च्या पूरपरिस्थितीत डॉ.कणसे यांनी केलेल्या मदत कार्याबद्दल त्यांना श्री चव्हाण यांच्या हस्ते
सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. क्षयरोग निर्मूलनात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, क्षयरोग
पथक टी.यु. (तालुका युनिट) राधानगरी – प्रथम क्रमांक, टी.यु.गारगोटी – द्वितीय क्रमांक, टी.यु.गगनबावडा –
तृतीय क्रमांक, उत्कृष्ट ग्रामीण रुग्णालय – मलकापूर, उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र – तारळे, क्षयरोग निर्मुलन
प्रीमियम लीग – २०२३ विजेता – कोल्हापूर ग्रामीण, उत्कृष्ट खाजगी वैद्यकिय व्यावसायिक – कुरडे चिल्ड्रन्स
हॉस्पिटल- प्रथम क्रमांक जयसिंगपूर, श्री. स्वामी समर्थ हॉस्पीटल, इचलकरंजी – द्वितीय क्रमांक, चौधरी
हॉस्पिटल, जयसिंगपूर – तृतीय क्रमांक, उत्कृष्ट खाजगी औषध विक्रते (व्यावसायिक)- महादेव मेडिकल
इचलकरंजी, क्षयरोग जनजागृतीपर आशा स्वयंसेविका वक्तृत्व स्पर्धा -२०२३ अनुराधा रणधीर ढेरे, प्रा.आ.केंद्र
कडगाव (ता.भुदरगड)- प्रथम क्रमांक, सीमा शरद पाटील , प्रा.आ.केंद्र घालवाड (ता. शिरोळ )- द्वितीय क्रमांक,
भाग्यश्री हरीश कांबळे प्रा.आ.केंद्र हेर्ले – तृतीय क्रमांक, क्षयरोग जनजागृतीपर आरोग्य कर्मचारी यांच्या म्हणी व
घोषवाक्य स्पर्धा-२०२३ एस.आर.कांबळे (एम.पी.डब्लू.) प्रा.आ.केंद्र शिरोली पुलाची – प्रथम क्रमांक, मनीषा
शंकर कुंभार (ए.एन.एम.), पुशिरे प्रा.आ.केंद्र पडळ -द्वितीय क्रमांक, संदीप मनोहर सरंजामे (एम.पी.डब्लू.),
शेड्शाळ, प्रा.आ.केंद्र. नृसिंहवाडी – तृतीय क्रमांक, समुदाय आरोग्य अधिकारी (सी.एच.ओ.) यांची “क्षयरोग
जनजागृतीपर पोस्टर स्पर्धा”-२०२३ सपना माने – यळगुड प्रा.आ.केंद्र हुपरी- प्रथम क्रमांक. डॉ.विनिता जाधव –
कसबा बीड, प्रा.आ.केंद्र माळ्याची शिरोली – द्वितीय क्रमांक. डॉ.निकिता मोहोले – करंबळी प्रा.आ.केंद्र.-कडगाव –
तृतीय क्रमांक, रोहन भावके – वेतवडे प्रा.आ.केंद्र. -कळे -तृतीय क्रमांक (विभागून) यांना मान्यवरांच्या हस्ते
सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.