भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : थकीत मोटारवाहन कराअभावी व खटला विभागाच्या केसेससाठी
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अटकावून ठेवलेल्या वाहनांचा ई लिलाव गुरुवार, दि. 6 एप्रिल 2023 रोजी
सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ई लिलाव पध्दतीने होणार
आहे. यासाठी दि. 31 मार्च 2023 पासून www.eauction.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध
राहील, अशी माहिती कराधन अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली आहे.
ई लिलावासाठी खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
(1) प्रसिध्दी दिनांक 31 मार्च 2023
2) ई लिलाव डाउनलोड/अपलोड सुरु होण्याचा दिनांक – 31 मार्च 2023. डाउनलोड समाप्त दिनांक
3 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत.
3) डीडी आणि कागदपत्रे सादर करण्याचा दिनांक- 3 एप्रिल 2023, वेळ सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत
4) मंजुरीचा दिनांक 5 एप्रिल 2023, सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत.
5) ई लिलाव दिनांक 6 एप्रिल 2023 सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत.
इच्छुकांनी होम पेजवर Bidder enrollment या ऑप्शनमध्ये नोंदणी करावी. लिलावामध्ये भाग
घेणाऱ्यांनी 500 रु. ऑनलाईन शुल्क भरावे. एकुण 10 वाहने असून अनामत शुल्क धनाकर्ष 1 लाख रु. डी.डी
स्वरुपात कार्यालयात जमा करणे बंधनकारक असेल. अयशस्वी लिलाव धारकांना अनामत स्वरुपातील डी.डी.
परत करण्यात येतील. डी.डी. Accounts officer Regional Transport office Kolhapur यांच्या नावे
काढण्यात यावा. शासकीय फी. शुल्क 500 रु. शासन जमा करण्यात येईल. लिलावाच्या अटी व नियम पाहण्याची
तारीख शुक्रवार, दि. 31 मार्च 2023 पासुन कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
आहे. संकेतस्थळावरील अटी व शर्तीचे अवलोकन करावे.
कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव / विक्री रद्द करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार प्रादेशिक
परिवहन अधिकारी तथा कराधन अधिकारी कोल्हापूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत, असेही श्री. पाटील
यांनी कळविले आहे.