भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी
त्याचबरोबर कल्याण व पुनर्वसनाच्या दृष्टिने योजना व सवलतींची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालय, कोल्हापूर येथील कल्याण संघटक यांचा माहे एप्रिल 2023 चा दौरा आयोजित करण्यात आला असून
जास्तीत -जास्त माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा
प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.
दौऱ्याचा दिनांक, दिवस, कार्यालयाचे नाव याप्रमाणे आहे-
दि. 5 एप्रिल रोजी पहिला बुधवार- तहसिल कार्यालय, राधानगरी, दि. 6 एप्रिल रोजी पहिला गुरुवार-
तहसिल कार्यालय, गडहिंग्लज, दि. 11 एप्रिल रोजी दुसरा मंगळवार- तहसिल कार्यालय, चंदगड, दि. 12 एप्रिल
रोजी दुसरा बुधवार- मा.सै.सं. टाकळी, ता. शिरोळ, ठिकाण- सैनिक टाकळी, दि. 13 एप्रिल रोजी दुसरा गुरुवार-
तहसिल कार्यालय, आजरा, दि. 18 एप्रिल रोजी तिसरा मंगळवार- तहसिल कार्यालय, हातकणंगले, दि. 19 एप्रिल
रोजी तिसरा बुधवार तहसिल कार्यालय, भुदरगड, ठिकाण- गारगोटी, दि. 20 एप्रिल रोजी तिसरा गुरुवार
तहसिल कार्यालय, शाहुवाडी, दि. 25 एप्रिल चौथा मंगळवार तहसिल कार्यालय, शिरोळ याप्रमाणे आयोजित
करण्यात आला आहे.
सर्व दौरे तहसिलदार यांच्या कार्यालयातील निर्देशित ठिकाणी होतील. या दिवशी शासकीय किंवा इतर
सुट्टी असल्यास त्या तालुक्याचा दौरा पुढील महिन्यात घेण्यात येईल, असेही श्री. कांबळे यांनी कळविले आहे.