भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यातील निवृत्ती वेतन धारक माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा
पत्नी रक्षा लेखा महानियंत्रक यांच्या मार्फत PCDA (Pension), प्रयागराज यांची टीम स्पर्श (SPARSH)
बाबतची माहिती देण्यासाठी तथा हयातीच्या दाखल्याबाबत तसेच पेन्शनबाबत माहिती व त्यासंबधी
अडीअडचणी सोडविण्यासाठी दिनांक 27 ते 29 मार्च 2023 या कालावधीमध्ये जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालय, कोल्हापुर येथे उपस्थित राहणार आहे.
कोल्हापुर जिल्ह्यातील पेन्शन (SPARSH) बाबत अडचणी असणाऱ्या निवृत्ती वेतन धारक माजी सैनिक/
माजी सैनिक विधवा पत्नी यांनी वरील कालावधीत सैनिकी सेवेची सर्व कागदपत्रे (उदा. मुळ डिस्चार्ज पुस्तक,
माजी सैनिक ओळख पत्र, पी. पी. ओ. आधार कार्ड व पॅन कार्ड, त्यांच्या छायांकीत प्रत व स्वत:चा मोबाईल नंबर
व ई- मेल आदी कागदपत्रासह संपर्क साधावा. याबाबतच्या अधिक माहितीकरीता या कार्यालयाचा दुरध्वनी क्र.
0231 – 2665812 वर संपर्क करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकरी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.