भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री जोतिरादित्य सिंधिया हे
कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 10.40 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व 11 वाजता
मोटारीने शिरोळाकडे प्रयाण. सायंकाळी 5.15 वाजता हुपरी, ता. हातकणंगले येथे आगमन चांदीचे दागिने
बनविणाऱ्या कामगारांशी संवाद. सायंकाळी 6.00 वाजता मोटारीने अब्दुललाटकडे प्रयाण. 6.15 वाजता
अब्दुललाट येथील कार्यक्रमास उपस्थिती. 7.15 वाजता मोटारीने कुरुंदवाडकडे प्रयाण. 7.30 वाजता कुरुंदवाड
येथील कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 9.15 वाजता कोल्हापूर येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार 24 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता मोटारीने जोतिबाकडे प्रयाण. 10 वाजता जोतिबा मंदिरास
भेट. 11 वाजता मोटारीने पन्हाळाकडे प्रयाण. 11.15 वाजता पन्हाळा येथील कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी
12.15 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. 1 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. 1.40 वाजता
कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व 2 वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण.