भन्नाट न्युज नेटवर्क
*चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या औचित्याने अभियानास सुरुवात
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): भारतीय संविधानात समाविष्ट विविध मूल्यांचा समाजामध्ये विद्यार्थ्यांमार्फत
प्रचार, प्रसार व्हावा तसेच विद्यार्थ्यांना संविधानातील हक्क, अधिकार, कर्तव्ये समजावीत व एक सुजाण नागरिक
म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांची माहिती विद्यार्थ्यांना समजावी, यासाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण व
लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर महाविद्यालयात दि. 20 मार्च
2023 रोजी सकाळी 9 वाजता ‘संविधान संवाद अभियान कार्यक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.
कार्यशाळेत लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे सचिव राज वैभव शोभा रामचंद्र हे विद्यार्थ्यांशी
संवाद साधणार आहेत. ‘संविधान संवाद अभियान’ हे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्राच्या
माध्यमातून समन्वय साधून आयोजित करण्यात येणार असून, तसे नियोजन करण्यात आले आहे. अभियान पुढील
वर्षभर चालणार असून अभियानाची सुरुवात महावीर महाविद्यालयापासून होत आहे. महाविद्यालयातील
जास्तीत-जास्त विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहेत.