भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका): जिल्ह्यामध्ये पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेला (PMNAM) अंतर्गत
शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार, दि. 20 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. आयटीआय उत्तीर्ण व शिकाऊ
उमेदवारी उत्तीर्ण तसेच इतर पदवी व पदविकाधारक, दहावी पास, दहावी नापास उमेदवारांनी मार्कलिस्ट व
आधारकार्ड घेवून मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे
अंशकालीन प्राचार्य महेश आवटे यांनी केले आहे.
मेळाव्यात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील किमान 50 नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत.
प्रशिक्षणार्थ्यांनी https://dgt.gov.in/ appmela2022/candidate_registration.php या संकेत स्थळावरुन
ऑन लाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. तसेच औद्योगिक आस्थापनांनी
https://dgt.gov.in/appmela2022/ establishment.php या संकेत स्थळांवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे,
असेही श्री. आवटे यांनी कळविले आहे.