भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका): प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर, हिरकणी फाऊंडेशन व
कोल्हापूर जिल्हा वाहन विरतक संघटना यांच्यामार्फत जागतिक महिला दिन व रस्ते सुरक्षा जनजागृती
निमित्त रविवार, दि. 19 मार्च 2023 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथून महिला कार व बाईक
रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅली प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून सकाळी 9 वाजता निघणार असून
सर्व महिलांनी या कार व बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक
पाटील यांनी केले आहे.
रॅलीचा मार्ग- प्रादेशिक परिवहन कार्यालय- पितळी गणपती- धैर्यप्रसाद हॉल- ताराराणी पुतळा – फ्लाय
ओव्हर- के. एस. बी. चौक- सायबर चौक- एन.सी.सी. ऑफीस- हॉकी स्टेडियम – इंदिरा सागर चौक- नंगीवली
चौक- मिरजकर तिकटी- माधुरी बेकरी- बिंदु चौक- शिवाजी चौक- सी.पी.आर. हॉस्पिटल- खानविलकर पेट्रोल
पंप- महावीर कॉलेज- पोष्ट ऑफीस- रेसिडेन्सी क्लब – प्रादेशिक परिवहन कार्यालय (समाप्त).
रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी https://www.townscript.com/e/pink-car rally-100332 या
संकेतस्थळावर किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे नाव नोंदणी करता येणार आहे. रॅलीमध्ये सहभागी
होण्यासाठी आतापर्यंत 200 बाईक आणि 100 कारची नोंदणी झाली असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली
आहे.