भन्नाट न्युज नेटवर्क
गडकिल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी आता कडक पावले उचलली जाणार असून वारंवार गडकिल्यांवर होणाऱ्या ओल्या पार्टी ला चाप बसणार आहे.महाराष्ट्र मध्ये शेकडो किल्ले असून ते हेरिटेज च्या नियंत्रणाखाली येतात. लाखो लोक गडकिल्यांवर भेट देत असतात.परंतु काही मद्यपी लोकांच्यामुळे त्याचे पावित्र्य राखले जात नाही.वेळोवेळी गडकिल्ले प्रेमी याबाबत जनजागृती करूनसुद्धा या मद्यपी ना काही फरक पडत नव्हता.मात्र आता राज्य सरकारने मद्यपान केल्यास थेट तीन महिने तुरंगवास आणि रु 10000 चा दंड करण्याचा प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवत असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.तसेच प्रत्येक गडकिल्यांवर मार्शल ची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली.