भन्नाट न्युज नेटवर्क
*शहाजी लॉ कॉलेज येथे अंमली पदार्थ विरोधी कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर, दि. 11 (जि.मा.का.) : अंमली पदार्थ व्यसनापासून दूर राहणे, अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या
विळख्यात अडकलेल्या मित्रांना अथवा व्यक्तींना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे, व्यक्ती अगर समूह अवैध अंमली
पदार्थ तस्करी, अंमली पदार्थ सेवन अथवा इतर कोणतीही अवैध कृती करीत असेल अथवा करण्याचे प्रयोजनात
असेल त्यासंबंधातील माहिती गोपनीयरित्या पोलीस विभागास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे
अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत शहाजी लॉ कॉलेज येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.
प्रवीण पाटील, शहाजी लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका एस. आर. सुरगीहल्ली, पोलीस नाईक महेश गवळी, स्थानिक
गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस हवालदार अजय काळे, पोलीस हवालदार सचिन पाटील उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे महेश गवळी यांनी अंमली पदार्थ विरोधी
मोहिमेची माहिती दिली व अंमली पदार्थाचे व्यसन लागणाऱ्या व्यक्तीची परिस्थिती कोणत्या टोकाला जावू शकते,
किती वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागते याबाबत त्यांनी सविस्तर माहिती यावेळी दिली.
श्री. वाघमोडे यांनी अंमली पदार्थ व्यसनाचे दुष्परिणाम, अवैध अंमली पदार्थांचे रॅकेट समूळ उध्वस्त करण्याची
पोलीस विभागाची मुख्य भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये इतर
महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पोलीस विभागास गोपनीयरित्या सहकार्य करण्याचे आवाहन
केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्थ ताम्हणकर तर आभार डॉ.अस्मिता पाटील यांनी मानले.