भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर दि. 3 (जिमाका) : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता इच्छुक व्यक्ती व
संस्थांनी सन 2023-24 साठी आपले रितसर अर्ज दिनांक 13 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत
सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक
आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व
साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद/दखल घ्यावी व इतरांना त्यापासून
प्रेरणा मिळावी, जेणेकरुन या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक
प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तीसाठी एक व सामजिक संस्थांसाठी एक असे एकूण
दोन पुरस्कार देण्यात येणार आहे.
समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिकांसाठी
आवश्यक पात्रता :
या योजनेनुसार वीरशैव-लिंगायत समाजाकरिता समाजकल्याण, समाज संघटनात्मक, कलात्मक
अध्यात्मिक प्रबोधन आणि साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे तथा कल्याणासाठी झटणा-या नामवंत, समाजसेवक,
अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक असावेत. वीरशैव-लिंगायत समाजासाठी कार्य करणारे समाजकल्याण,
कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कमीत कमी दहा वर्षे कार्य केलेले
असावे. पुरस्कार देतांना सामाजिक कार्यकत्या पुरुषांचे वय ५० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे. स्त्रियांचे वय
४० वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त असावे व अपवादात्मक प्रकरणी वरील वय शिथिल करण्याचे अधिकार शासनाने
यासाठी नियुक्त केलेल्या समितीकडे राहतील. कोणत्याही व्यक्तीस एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र
समजण्यात येणार नाही. पुरस्कार मिळण्यास पात्रता व्यक्तिगत, मौलिक कार्यावरुन ठरविण्यात येईल. समाजातील
त्यांच्या पदाचा याबाबतीत विचार करण्यात येणार नाही. पुरस्कार मिळण्यास आमदार, खासदार, जिल्हा परिषद
सभासद किंवा कोणताही लोकप्रतिनिधी पात्र असणार नाही. वरील क्षेत्रात कमीत कमी १० वर्ष वैयक्तिक किंवा
संघटनात्मक अभिजात कार्य करणा-या व्यक्ती या पुरस्कारास पात्र असतील.
सामाजिक संस्थांसाठी पात्रता-
समाजकल्याण क्षेत्रात वीरशैव लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अध्यात्मिक विकास करणे,
अन्याय निर्मलुन करणे, अंधश्रध्दा रुढी निर्मुलन करणे, सामाजिक न्याय मिळवून देणे, समाजाला आरक्षण व
संरक्षण मिळवून देणे, सामाजिक व संघटनात्मक जनजागरण करणे इ. क्षेत्रात कार्य करणा-या सामाजिक संस्थांना
हा पुरस्कार दिला जाईल. संस्था पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट १९६० खाली संस्था
नोंदणीकृत्त असावी. स्वयंसेवी संस्थेचे वीरशैव लिंगायत समाजकल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य १० वर्षांहून अधिक
असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणा-या संस्थांच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्याचे
अधिकार शासन नियुक्त समितीस राहतील. स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व
सेवा ही पक्षातील व राजकारणापासून स्वतंत्र व अलिप्त असावे. वीरशैव लिंगायत समाजसेवा आणि समाजाचा
विकास या क्षेत्रातील कामाचा विचार करुनच हा पुरस्कार स्वयंसेवी संस्थाना दिला जाईल.