भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): नेहरु युवा केंद्रामार्फत एक दिवसीय जिल्हास्तरीय पडोस युवा संसद
कार्यक्रमाचे राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथे दि. 3 मार्च 2023 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत
आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी
https://forms.gle/ue9Ew7oLiWBkS4wU7 या लिंकव्दारे आपली नावनोंदणी करण्याचे आवाहन नेहरु
युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी यांनी केले आहे.
राष्ट्रीय युवा नेतृत्व कार्यक्रम ही केंद्र सरकारची योजना आहे. या एकदिवसीय कार्यक्रमात 4 सत्र आयोजित
करण्यात येणार आहेत. यामध्ये भारताचे G20 अध्यक्षपदाचे महत्व व Y20 युवा शिखर परिषद, मिशन लाइफ
आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष परस्पर संवाद सत्र, युवा संसद चर्चासत्रे व कोल्हापूर जिल्ह्याचे वेगळेपण
दाखवणारा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
कार्यक्रमाचा उद्देश युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास
प्रवृत्त करणे व त्यांना राष्ट्र उभारणीच्या विकास प्रक्रियेत आणणे हा असून सहभागी होणाऱ्या युवक-युवतींना
प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही श्रीमती सैनी यांनी कळविले आहे.