भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक इयत्ता 12 वी ची परीक्षा दिनांक. 21 फेब्रुवारी ते दिनांक. 21
मार्च 2023 रोजी पर्यंत तसेच माध्यमिक शालांत इयत्ता 10 वी ची परीक्षा दिनांक 2 ते 25 मार्च 2023 या
कालावधीत घेण्यात येणार आहेत. परीक्षा शांततेत, सुव्यवस्थेत व सुरळीत पार पाडण्यासाठी परिक्षेच्या परीक्षा
केंद्रावरील/उपकेंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परीसरात 10 वी व 12 वी
परीक्षार्थी व परीक्षेकामी नेमले अधिकारी/कर्मचारी वगळता इतर व्यक्तींना प्रवेश बंदी करणेस क्रिमिनल प्रोसिजर
कोड 1973 मधील कलम 144 लागू करण्याचे निर्देश अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिले.
जिल्ह्यामध्ये उच्च माध्यमिक इयत्ता 12 वी 68 परीक्षा केंद्रे व माध्यमिक शालांत इयत्ता 10 वी 136
परीक्षा केंद्रे असून नमूद परिक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राचे 100
मिटर आवारात/परिसरात 10 वी व 12 वी परीक्षार्थी व परीक्षेकामी नेमले अधिकारी/कर्मचारी वगळता इतर
व्यक्तींना प्रवेश करण्यास बंदी घालणे आवश्यक आहे. दिनांक. 21 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 25 मार्च 2023 या
कालावधीत (ज्या दिवशी परीक्षा पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 07.00 वा. पासून ते सायं.
18.00 वाजेपर्यंत सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 अन्वये याव्दारे बंदी घालीत आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. बंदी आदेश परीक्षेचे
कामकाजासाठी नेमलेले अधिकारी / कर्मचारी व 10 वी व 12 वी परीक्षार्थी यांना, लागू राहणार नाही. असेही
श्री. कांबळे यांनी कळविले आहे.