भन्नाट न्युज नेटवर्क
दि. 18 (जिमाका): केंद्रीय गृह मंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे कोल्हापूर जिल्हा
दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी 1.45
वाजता श्री महालक्ष्मी (श्री अंबाबाई) मंदिर येथे आगमन. दुपारी 1.45 ते 2.15 वाजता श्री अंबाबाई दर्शनासाठी
राखीव. दुपारी 2.30 ते 2.35 वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी
राखीव. दुपारी 2.40 वाजता हॉटेल पंचशील येथे आगमन. दुपारी 2.40 ते 3.10 वाजेपर्यंत राखीव. (स्थळ: हॉटेल
पंचशील) दुपारी 3.15 वाजता लोहिया हायस्कूलकडे प्रयाण. दुपारी 3.15 ते 4.30 वाजता लोहिया येथे
आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता भाजप कार्यालय, नागाळा पार्ककडे प्रयाण. सायंकाळी 5 ते
6.30 वाजता भाजपच्या विजय संकल्प रॅलीसाठी राखीव. सायंकाळी 7 वाजता आगमन. सायंकाळी 7 ते 7.30
वाजता राखीव. रात्री 8 वाजता हॉटेल पॅव्हेलियन येथे आगमन. रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत बैठकीसाठी राखीव. (स्थळ
: हॉटेल पॅव्हेलियन) रात्री 9.25 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री 9.30 वाजता विमानाने
दिल्लीकडे प्रयाण.