कोल्हापूरः मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हज यात्रेसाठी केंद्रीय हज कमिटी व महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या निर्देशानुसार
हज यात्रेकरूंसाठी २०२३-२४ यात्रेचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची
प्रक्रिया शनिवार (ता. ११) पासून सुरू होणार आहे. दसरा चौक येथील मुस्लिम
बोर्डिंग येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल
करता येतील. मुस्लिम वेलफेअर फौंडेशनहज फाउंडेशन, लिंब्रास फाउंडेशन,
संचलित इचलकरंजी हज कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्हाभर ही
प्रक्रिया राबवली जाणार आहे.
कोल्हापूर शहर, इचलकरंजी, आजरा, चंदगड,
गडहिंग्लज, शिरोळ-राजापूर, कागल, शाहूवाडी, पन्हाळा, जयसिंगपूर, पेठवडगाव
इचलकरंजी मलकापूर येथे अर्ज दाखल करण्याची सुविधा करण्यात आली आहे. यात्रेकरूंनी
पासपोर्ट, आधार कार्ड, तीन पासपोर्ट साईज रंगीत फोटो, वारसाचे नाव, दोन
मोबाईल क्रमांक अशा कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन हाजी समीर मुजावर
इकबाल देसाई, सादिक जमादार यांनी केले आहे.